Friday 9 December 2016

शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर

मुंबई‍ दि 8 :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची (इयत्ता 8 वी) अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार असून मराठीउर्दूहिंदीगुजराथीइंग्रजीतेलुगुसिंधी व कन्नड या आठ माध्यमातून तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदपुणे(एमएससीईआरटीयांच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाच्या आधारित घेतली जाईल. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदपुणे यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाच्या आधारित घेतली जाईल.
इयत्ता 5 वीइयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षाविद्यानिकेतन प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी दिनांक 1 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंतचा कालावधी आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरण्यासाठी 1 डिसेंबर 2016 ते 2 जानेवारी 2017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. चलन अपडेट करणे व प्रपत्र अ ची प्रिंट घेण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर 2016 ते 3 जानेवारी 2017 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
विलंब शुल्कासह या परीक्षेसाठी आवेदनपत्रे दिनांक 1 ते 7 जानेवारी 2017 पर्यंत भरता येणार आहेत. या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरण्यासाठी दिनांक 3 ते 9 जानेवारी 2017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. चलन अपडेट करणे व प्रपत्र अ ची प्रिंट घेण्यासाठी दिनांक 3 ते 10 जानेवारी 2017 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
तसेच अतिविलंब शुल्कासह या परीक्षेसाठी आवेदनपत्रे दिनांक 8 जानेवारी 2017 ते या परीक्षेपूर्वी 15 दिवस अगोदरपर्यंत भरता येतील. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरणे आणि चलन अपडेट करणे व प्रपत्र `` ची प्रिंट घेण्यासाठी 8 जानेवारी 2017 ते या परीक्षेपूर्वी 15 दिवस असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.


या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :-
•        School login साठी आपल्या शाळेचा UDISE code हाच Password आहे. तो वापरुन लॉगिन करावे व Password  बदलून पुन्हा लाँगिन करावे.
•        शाळेने सर्वप्रथम शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरणे आवश्यक आहे. शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरुन Confirm केल्यानंतरच विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरता येणार आहेत.
•        शुल्क भरण्याकरिता Online आणि Offline Payment असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. Offline Payment  हा पर्याय निवडल्यास फक्त बँक ऑफ इंडियाच्या शाखेतच शुल्क जमा करता येईल.
•        ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो स्कॅन करुन जतन करुन ठेवावेत.
•        ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये लागू असेल तेथे 20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार/ प्रांत अधिकारी) यांचे प्रमाणपत्र तसेच भूमिहीन शेतमजूर असण्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र upload करणे अनिवार्य आहे.
•        आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक भरणे अनिवार्य आहे.
•        विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र प्रिंट करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेची आवेदनपत्रे भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी (प्रपत्र अ)असल्यास प्रमाणपत्र (पालकांचे उत्पन्न 20 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्रपालक भूमिहीन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र) गटशिक्षणाधिकारी/वॉर्ड ऑफीसर यांनी तपासणीकरिताonline उपलब्ध करुन देण्यात येतील.
•        पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि विद्यानिकेतन (शासकीयआदिवासीविमुक्त जाती आणि भटक्या जमाती) प्रवेश परीक्षा यासाठी एकच आवेदनपत्र आहे. त्यात विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना विकल्प देण्यात आला आहे.
•        याबाबत सविस्तर माहिती व सूचनांसाठी परिषदेच्या www.puppss.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

00000

No comments:

Post a Comment