Saturday 3 December 2016

आळंदी प्रकल्प बैठक

                           आळंदी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न


नाशिक दि. 3: आळंदी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील रब्बी व उन्हाळी  हंगाम आवर्तनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक आ. बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली  मखमलाबाद येथे संपन्न झाली.
बैठकीस कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे , सहाय्यक अभियंता नरेंद्र महाजन, शाखा अभियंता टी.पी .जोशी ,सोनवणे एस यु, ए आर निकम, लाभक्षेत्रातील लाभधारक पंडीतराव पिंगळे जे.टी.शिदे, पुडंलिक खोडे,सचिन पिंगळे ,भाऊसाहेब ढिकले, परशराम शिंदे, यशवंत ढिकलेआदी उपस्थित होते.
          आळंदी प्रकल्प यावर्षी पूर्वक्षमतेने भरलेला असल्याने आणि पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाल्याने या पाण्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी  सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन 13 डिसेंबर 2016 रोजी सोडण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला लाभधारक आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाव्दारे पाण्याची बचत करुन जास्तीत जास्त सिंचन करण्याचा प्रयत्न करावा, अशी सुचना आ. सानप यांनी केली.

          बैठकीस लाभधारक शेतकरी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment