Thursday 1 December 2016

गोदावरी नदी प्रदुषण बैठक

गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
-         पर्यावरण मंत्री रामदास कदम 

नाशिक, दि.1:- गोदावरी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आदी उपस्थित होते.
          श्री. कदम म्हणाले, गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यास प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांनी  एकत्रित प्रयत्न करावे.  प्लास्टिक पिशव्यांमुळे  मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवरील निर्बंधाची  अंमलबजावणी कटाक्षाने करावीत आणि दोषींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. याबाबतचा अहवाल दर दोन महिन्यांनतर शासनास सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
 गंगापूर धरणाच्या वरील भागात अजून एक जास्त क्षमतेचे धरण तयार झाल्यास पाण्याचा साठा वाढून वर्षभर पाणी वाहते राहाण्यास मदत होईल. नदी प्रदूषण करण्यासाठी ही बाब महत्वाची असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे  धरणासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

           सिंहस्थ कालावधीत गोदावरीतील पाणी स्वच्छ राहावे यासाठी अनेक यशस्वी प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डवले यांनी सांगितले. काही प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा चांगला परिणाम दिसेल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद नगरपलिका यांच्या सहाय्याने प्लास्टिक बंदीसाठी कायद्याची कडक अंबलबजावणी केली जाईल, असे सांगितले.
की नदीमध्ये अशुद्ध सांडपाणी जाणारा कचरा रोखण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे महानगरपालिका आयुक्त कृष्णा यांनी सांगितले आहे. केंद्र शासनाच्या सहाय्याने नकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या काही महिन्यात कार्यांन्वित करण्यात येणार असल्याची माहिती  त्यांनी दिली.


यापूर्वी पर्यावरण मंत्री श्री.कदम यांनी रामकुंड, तपोवन  घारपुरे घाट परिसरात गोदावरी नदीपात्राची पाहाणी केली. तसेच महानगरपालिकेच्या तपोवन येथील मैला सांडपाणी व्यवस्थापन केंद्रास भेट देऊन माहिती घेतली.

No comments:

Post a Comment