Saturday 3 December 2016

बेघर स्वातंत्र्य सैनिकांना घरकुल

बेघर स्वातंत्र्य सैनिकांना घरकुल
 तहसिल कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन


नाशिक, दि.3:- स्वातंत्र्यसैनिकांना घर घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध देण्यात येणार असून त्यासाठी पात्र स्वातंत्र्य सैनिकांची संख्या निश्चित होण्यासाठी निकष पूर्ण करणाऱ्यांनी जिल्ह्यातील संबंधित तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावे.
राज्य शासनाने 2016-17 च्या अर्थसंकल्पामध्ये हयात असणारे स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या हयात पत्नी यांना त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामधील निकषानुसार राज्य अथवा केंद्र शासनाकडून निवृत्ती वेतन घेणारे स्वातंत्र्यसैनिक पात्र ठरणार आहेत.
 स्वातंत्र्यसैनिकाकडे व त्यांच्या नामनिर्देशानुसार शासकिय नोकरी मिळाली आहे अशी निकटवर्तीय व्यक्ती यांचे भारतात कोठेही घर नसावे, त्याबाबत मागील दहा वर्षांपासूनचा पूराव्याच्या कागदपत्रे (मिळकतीबाबतचे दाखले, भाड्याचे घराबाबतचे करारनामे आदी )सादर करावीत. शेती किंवा घरासाठी जमीन मिळाली असल्यास, शासकिय निवासस्थान मिळालेल्या अथवा म्हाडा, सिडको यांच्या गृहनिर्माण योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असल्यास ते अर्थसहाय्यास अपात्र ठरतील.
निकषासाठीच्या अटी, शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या पत्नी यांनी चार महिन्यांच्या आत तहसिल कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.
                                                        ---


No comments:

Post a Comment