Tuesday 27 December 2016

गैरव्यवहाराबाबत माहिती देण्याचे आवाहन

भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहाराबाबत माहिती देण्याचे आवाहन

नाशिक दि.27 :- नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहाराची माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच शासन अनुदानीत संस्थांकडून माहिती मिळविता येते. अशा माहितीत भ्रष्टाचार झाल्याचे अथवा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी 1064 या टोल फ्री क्रमांकावार किंवा 0253-2578230 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिक spacbnasik@mahapolice.gov.in या ई-मेल पत्त्यावर किंवा 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार करू शकतील.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नुकतेच केटीएचम महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराबाबत श्री.उगले यांनी माहिती दिली. जळगाव आणि नंदुरबार येथेदेखील जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांनी या जनजागृती अभियानात सहभाग घेऊन गैरव्यवहाराबाबत माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

No comments:

Post a Comment