Tuesday 20 December 2016

सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रम नियोजन भवन येथे संपन्न

          नाशिक दि.20 :- सशस्त्र  सेना ध्वजदिन 2016 निधी संकलनाचा शुभारंभ तसेच  ध्वज उत्कृष्ट निधी संकलन पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे संपन्न झाला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप चौधरी, उपवनसंरक्षक श्री.रामानुजुम ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव, निवृत्त मेजर चंद्रसेन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. खेडकर यांनी ध्वज दिन निधी संकलन हे कर्तव्य  म्हणून करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात मेजर जाधव यांनी ध्वज दिनाचे महत्व  सांगितले. यावेळी निधी संकलन केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली व उपस्थितांना ध्वज स्टिकर लावण्यात आले
***********************


No comments:

Post a Comment