Wednesday 14 December 2016

सिंचनासाठी मागणी

                               सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.14 :-  मालेगांव पाटंबधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील चणकापूर मोठा प्रकल्प तसेच हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या हे मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्पाच्या ठिकाणावरून पाटपाण्याचे पाणी घेऊ इच्छिाणाऱ्या शेतकऱ्यांनी नमुना नं.7 पाणी अर्ज 31 डिसेंबर 2016 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात दाखल करावे, असे आवाहन मालेगांव पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
           शासन धोरणानुसार कालवा सल्लागार समितीच्या बैठकिमध्ये ठरणाऱ्या नियोजनानुसार सिंचनाचे नियोजन करण्यात येईल. चणकापुर प्रकल्पावर सिंचनासाठी एक आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मर्यादित क्षेत्रासाठी आवर्तनाचे नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याच्या कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही याची सर्वसंबधितांनी दक्षता घ्यावी. पाटमोट संबंध तसेच जास्त उडाफ्याचे जागी मागणी असेल तेथे पाणी पुरवठा केला जाणार नाही.
 पाणी नाश किंवा बिनअर्जी क्षेत्रास पाणी घेतलेले आढळल्यास संबंधिताविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल. काळ्या यादीत नाव असलेल्यांना मंजुरी दिली जाणार नाही.  थकबाकीदारांबाबत शासनाचे प्रचलित आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.  पाणी अर्ज नं.7 सोबत सातबारा उतारा जोडणे अनिवार्य राहील. सातबारा उतारावर ज्यांचे नाव असेल त्याचेच नावे पाणी अर्ज मंजुरी दिली जाईल.
 उपसा/ठिबक/तुषार,सिंचन धारकांना नियोजनानुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. आरक्षणामुळे आवर्तनामध्ये फेरबदल करावा लागल्यास पिकाचे उत्पन्न कमी आल्यास किंवा नुकसान झाल्यास याबाबत विभागाची कोणतीही जाबाबदारी राहणार नाही. तरी शेतकऱ्यांनी उभी पिके व चारा पिके घेवून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता ,मालेगांव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

*********

No comments:

Post a Comment