Thursday 15 December 2016

मागेल त्याला शेततळे

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावेत


नाशिक, दि.15:-  जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागेल त्याला शेततळे’ योजना अनुदान द्धतीने राबवण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. शासनाने  सन 2016-17 पासून योजना राबविण्यास 10 ऑक्टोबर 2016 रोजी  मुदतवाढीसह मान्यता दिली आहे
शेतकऱ्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असून शेततळ्यांमुळे  कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. यासाठी पूर्वीची 50 पैसे आणेवारीची अट रद्द करण्यात आली असून लाभार्थ्यांना रुपये पन्नास  हजार अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी  तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज नमूना https://aaplesarkar.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक यांनी केले आहे.


00000

No comments:

Post a Comment