Sunday 25 December 2016

नाशिक स्पोर्ट्स फेस्टिव्हलचा समारोप

                                           मिनी मॅरेथॉनने नाशिक स्पोर्ट्स फेस्टिव्हलचा समारोप

                                                       
 नाशिक, दि. 25- जिल्हा प्रशासन दै.लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक स्पोर्टस् ॲडव्हेंचर फेस्टीव्हलचा समारोप आज मिनी मॅरेथॉनने करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोल्फ क्लब येथून आज 18 वर्षांवरील पुरुष महिलांची स्वतंत्र 10 किमीची मिनी मॅरेथॉन, 18 वर्षांखालील पुरुष महिलांची 10 किमीची मिनी मॅरेथॉन आणि फन रनचे आयोजन करण्यात आले होते. मिनी मॅरेथॉनचा मार्ग गोल्फ क्लब मैदान, एबीबी सर्कल, गंगापूर रोड, अशोक स्तंभ, गडकरी चौक परत गोल्फ क्लब मैदान असा 10 किमीचा होता.
याचबरोबर आरोग्यासाठी धावणाऱ्या नागरिकांसाठी खास आयोजित फन रनलाही मोठा प्रतिसाद लाभला होता. यावेळी सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनिस, लोकमतचे बी. बी. चांडक, महेश गुप्ता, किरण चव्हाण यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, युवक, विद्यार्थी नागरीकांचा मोठा सहभाग होता.  मॅरेथॉनच्या शुभारंभ प्रसंगी तालरुद्र ढोल पथकाने वादनाचे विविध प्रकार सादर केले.
खेळांसाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत आयोजित या स्पोर्टस् ॲडव्हेंचर फेस्टीव्हलच्या माध्यमातून शहरात ट्रेकिंग, बोटींग, सायकलिंग आणि मॅरेथॉन आदी साहसी खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

**********

No comments:

Post a Comment