Tuesday 29 November 2016

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2017 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
        नाशिक दि- 29:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 सालात होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित  अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रकानुसार  राज्य सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात डिसेंबर 2016 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 2 एप्रिल 2017 रोजी तर मुख्य परीक्षा 16, 17 18 सप्टेंबर 2017 रोजी होईल.
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात जानेवारी 2017 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 12 मार्च  रोजी तर मुख्य परीक्षा 11 जुन रोजी होईल.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारी मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट रोजी होईल. 
लिपिक टंकलेखक परीक्षची जाहिरात फेब्रुवारी मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 14 मे  रोजी तर मुख्य परीक्षा 3 सप्टेंबर  रोजी होईल.
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षाची जाहिरात फेब्रुवारी मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 21 मे रोजी तर मुख्य परीक्षा 8 ऑक्टोबर रोजी होईल.
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षची जाहिरात फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा 2 जुलै रोजी तर मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर रोजी होईल. महाराष्ट्र वन सेवा परीक्षेची जाहिरात मार्च 2017 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 4 जुन रोजी तर मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर रोजी होईल.
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जाहिरात मार्च मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 9 जुलै रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 26 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 26 नोव्हेंबर रोजी  महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 17 डिसेंबर रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षाची मुख्य परीक्षा 24 डिसेंबर रोजी होईल.
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाची जाहिरात एप्रिलमध्ये प्रकाशित होणार असून मुख्य परीक्षा 25 जून रोजी होईल.
विक्रीकर निरीक्ष, सहायक कक्ष अधिकारी पोलीस उप निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात एप्रिल  मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 16 जुलै रोजी होईल. सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 10 डिसेंबर रोजी, पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबर 2017 रोजी विक्रीकर निरीक्ष मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2018 रोजी होईल.
कर सहायक परीक्षेची जाहिरात एप्रिल 2017 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 20 ऑगस्ट  रोजी तर मुख्य परीक्षा 31 डिसेंबर 2017 रोजी होईल.
महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेची जाहिरात एप्रिल मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 30 जुलै रोजी तर मुख्य परीक्षा 17 डिसेंबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाची जाहिरात सप्टेंबर मध्ये प्रकाशित होणार असून मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबर 2017 रोजी होणार आहे.
तसेच 2016 सालातील तांत्रिक सहायक पदासाठी मुख्य परीक्षा 15 जानेवारी 2017 रोजी आणि विक्रीकर निरीक्षक पदासाठी  पूर्व परीक्षा 29 जानेवारी तर मुख्य परीक्षा 28 मे 2017 रोजी होणार आहे.
संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परिक्षा घेणाऱ्या इतर संस्थांचे परिक्षांचे वेळापत्रक  विचारात  घेऊन  आयोगाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून कोणत्याही परिक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची  दक्षता घेण्यात आली आहे. वेळापत्रकाची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाचे अवर सचिव सु.ह.अवताडे यांनी कळविले आहे.


0000000

बँक खाते उघडण्यासाठी सुविधा

बँक खाते उघडण्यासाठी निमा हाऊस आणि सिन्नर एमआयडीसी येथे सुविधा
          नाशिक दि.29 :- बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, युनिअन बँक, देना बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि बँक ऑफ इंडिया  निमा हाऊस येथे तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सिन्नर औद्योगिक क्षेत्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे बँक खाते उघडण्यासाठी व्यवस्था केली आहे.
          केंद्र सरकारने संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांची बँक खाती सुरू करण्याबाबत दिलेल्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध उद्योग संस्थांच्या सुमारे 45 हजार कामगारांची बँक खाती नसल्याची माहिती देण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार उद्योग संस्था किंवा कारखान्यातील कामगारांचे खाते सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक चव्हाण यांनी इएसआयसी (कर्मचारी राज्य बीमा निगम) आणि निमा कार्यालयाला भेट दिली. बँक ऑफ महाराष्ट्रने सातपूर आणि अंबड येथील इएसआयसी कार्यालयात दोन काऊंटर सुरू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार श्री.चव्हाण यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बँक काऊंटर सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
बँक खाते सुरू करू इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड आणि ओळखपत्राची सत्यप्रतीसह तीन  फोटो सोबत आणावेत. दुपारी 12 ते सायंकाळी 8 या वेळेत कामगारांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक आणि निमातर्फे करण्यात आले आहे.

----

Saturday 26 November 2016

वाहनाचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र

वाहनाचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत
          नाशिक दि.26 :-  मोटार वाहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी वाहनाचे वैध प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र मागितल्यानंतर प्रतिवेदीत दिनांकापासून वाहन मालकांना सात दिवसात प्रमाणपत्र सादर करता येईल. त्यासाठी कोणताही दंड लागू असणार नाही.
          वैध प्रमाणपत्र सात दिवसाच्या आत सादर न केल्यास 200 रुपये दंड आकरण्यात येतो. वाहन प्रदुषण चाचणीत वाहन सात दिवसाच्या आत पास न झाल्यास व तसे प्रमाणपत्र न सादर केल्यास  मालक व चालकास प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात येतो. रस्त्यावर फक्त पीयुसी प्रमाणपत्र सादर न केल्यास कोणताही दंड लागू असणार नाही याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.

------

Thursday 10 November 2016

गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन

गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.10 :-  गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या हातगाव-1, खडकीसिम, वाघळा-1, ब्राम्हणशेवगा, पिंपरखेड, कुंझर-2, वाघळा-2, वलठाण, राजदेहरे, देवळी भोरस, कृष्णापुरी ता.चाळीसगाव पथराड ता. भडगाव तसेच म्हसवा, शिरसमणी, सावरखेडा ता.पारोळा, मन्यारखेडा, विटनेर ता.जळगांव व पदमालय खडकेसिम ता.एरंडोल लघु प्रकल्पावरुन काल्याद्वारे कालवाप्रवाही, कालवाउपसा, जलाशयउपसा लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरून उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहीरीवरून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या लाभधारकांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2016 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          यावर्षी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत गहु, हरबरा, ज्वारी, हा.दुरी, दादर, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला आदी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी 2015-16 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी. भरणा उडाफ्याचा व पाटमोट संबध नसावा.  प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या सलग क्षेत्रास मंजुरी देण्यात येईल. उडाफ्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये.
          शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय संबंधीत पाटशाखेत किंवा ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देताना सातबारा उतारा अथवा खाते पुस्तिका पाटशाखेत दाखवावी लागेल. अटींच्या पुर्ततेसह नमुना नं 7, 7अ आणि 7ब पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2016 नंतर वाढविली जाणार नाही.
          पिण्याचे पाण्याचे आरक्षण किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. मंजूरी पाटबंधारे अधिनियमानुसार राहणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करून अधिकाधीक लाभधारकांनी पाण्याचा  लाभ घ्यावा,  असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
         

                                                +++

मन्याड, बोरी, अंजनी प्रकल्पांतर्गत सिंचन

मन्याड, बोरी, अंजनी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.10 :-  गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या मन्याड, बोरी, व अंजनी (काळा बंधारा) मध्यम प्रकल्पावरील कालव्याद्वारे कालवाप्रवाही, कालवाउपसा जलाशय उपसा यावरून उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहीरीवरून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या लाभधारकांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2016 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          यावर्षी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत गहु, हरबरा, ज्वारी, हा.दुरी, दादर, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला आदी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी 2015-16 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी. भरणा उडाफ्याचा व पाटमोट संबध नसावा.  प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या सलग क्षेत्रास मंजुरी देण्यात येईल. उडाफ्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये.
          शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय संबंधीत पाटशाखेत किंवा ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देताना सातबारा उतारा अथवा खाते पुस्तिका पाटशाखेत दाखवावी लागेल. अटींच्या पुर्ततेसह नमुना नं 7, 7अ आणि 7ब पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2016 नंतर वाढविली जाणार नाही.

          पिण्याचे पाण्याचे आरक्षण किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. मंजूरी पाटबंधारे अधिनियमानुसार राहणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करून अधिकाधीक लाभधारकांनी पाण्याचा  लाभ घ्यावा,  असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

गिरणा प्रकल्पांतर्गत सिंचन

 गिरणा प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.10 :-  गिरणा प्रकल्पांतर्गत असलेल्या पांझण डावा कालवा,  जामदा डावा  कालवा, जामदा उजवा कालवा,निम्न गिरणा कालव्याद्वारे कालप्रवाही, कालवा उपसा जलाशय उपसा लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरून उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहीरीवरून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या लाभधारकांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2016 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          यावर्षी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत गहु, हरबरा, ज्वारी, हा.दुरी, दादर, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला आदी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी 2015-16 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी. भरणा उडाफ्याचा व पाटमोट संबध नसावा.  प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या सलग क्षेत्रास मंजुरी देण्यात येईल. उडाफ्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये.
          शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय संबंधीत पाटशाखेत किंवा ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देताना सातबारा उतारा अथवा खाते पुस्तिका पाटशाखेत दाखवावी लागेल. अटींच्या पुर्ततेसह नमुना नं 7, 7अ आणि 7ब पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2016 नंतर वाढविली जाणार नाही.
          पिण्याचे पाण्याचे आरक्षण किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. मंजूरी पाटबंधारे अधिनियमानुसार राहणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करून अधिकाधीक लाभधारकांनी पाण्याचा  लाभ घ्यावा,  असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
         

                                                +++

मालेगाव शहर स्वच्छता अभियान

मालेगाव शहर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी

          नाशिक दि.10 :-  स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या 8 डिसेंबर रोजी मालेगाव शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
मालेगाव शहर स्वच्छता अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक  अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, मालेगाव मनपा आयुक्त आर.एस. जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त रघुनाथ गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी काही वेळ देणे अपेक्षित आहे. त्यानुसार नाशिक येथे सतत दोन वर्षे नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. स्वच्छतेत  नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तालुकास्तरावर मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. एकत्रित प्रयत्नातून जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचण्यास यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मालेगाव येथे होणाऱ्या मोहिमेत शेजारील तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत.  विविध विभागांनी सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती आठ दिवसात प्रशासनाकडे सादर करावी. महानगरपालिकेने वातावरण निर्मितीवर अधिक भर द्यावा. स्वच्छता मोहिमेच्या दिवशी वृक्षारोपणदेखील करण्यात यावे. स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संस्थांनादेखील मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री.शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेनंतरदेखील शहरात कायमस्वरुपी स्वच्छता राहण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी सुचना केली.
श्री.शंभरकर यांनी जिल्हा परिषदेतर्फे ‘स्वचछ भारत अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अभियानातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहील, अशी ग्वाही दिली.
श्री.गावडे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित स्वच्छता उपक्रमांची माहिती देताना सुक्ष्म नियोजनासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली. कचरा उचलण्यासाठी पर्याप्त सुविधा करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
श्री.स्वामी यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची माहिती दिली. स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग वाढविणे आणि शहरातील समस्या जाणून घेणे हा अभियानाचा उद्देश असून अभियानासाठी शहराची 40 विविध भागात विभागणी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक भागाच्या स्वचछतेची जबाबदारी निश्चित समूहाकडे दिली जाणार असून त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

----

Wednesday 9 November 2016

लाच स्विकारताना अटक

पोलीस हवालदार मानकर यांना लाचेची रक्कम स्विकारताना अटक
          नाशिक दि.9 :-  वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे येथील हवालदार आलोसे महारु नावजी मानकर यांना गुन्ह्याच्या तपासात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तसे गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी करण्याप्रकरणी मालेगाव येथील हॉटेल तुफान समोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
          वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध 8 सप्टेंबर 2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मानकर यांचेकडे आहे. कोणऱ्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा त्याच्यावतीने  कोणी खाजगी इसम लाचेच मागणी करीत असतील तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. यासाठी विभागामार्फत 1064 या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे.
          लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावायाचा असल्यास किंवा कार्यप्रणालीबाबत माहिती हवी असल्यास नाशिक 0253-2575628/2578230, अहमदनगर 0241-2423677, धुळे 02562-234020, नंदुरबार 02564-230009 आणि जळगाव जिल्ह्यासाठी टोल फ्री क्रमांका व्यतिरिक्त 0257-2235477 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे.

----

सिंचनासाठी मागणी

सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.9 :-  उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा 0 ते 130 किमी, ओझरखेड डावा  कालवा, पुणेगाव डावा कालवा, तसेच करंजवण, पालखेड, वाघाड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव धरणाच्या फुगवट्यातील, करंजवण, सावरगाव, जांबुटके व खडकमाळेगाव लघुप्रकल्प आणि रौळसपिंप्री व शिरसगाव कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या पाणी वापर संस्था आणि   शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज 25 नोव्हेंबर 2016 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          जलाशयात उपलब्ध  पाण्यातून बिगर सिंचन आरक्षणाचे पाणी  वजा जाता मोठ्या प्रकल्पांसाठी दोन आवर्तनात आणि लघु प्रकल्पांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिर्घ मुदतीच्या पाणी वापर संस्थांना रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरीता विहीरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या उभ्या पिकांसाठी दोन आवर्तनात सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
 अधिक पाणी लागणाऱ्या पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी  संबंधीत  लाभधारकाची राहील. पाणी वापर संस्थांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी मागणी अर्ज 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नजीकच्या शाखा कार्यालयात सादर करावे.
पाणी वापर संस्थांनी त्यांची थकबाकी भरल्याशिवाय पाणी मागणी अर्ज मंजूर केला जाणार नाही. संस्थांनी त्यांच्या हद्दीतील शेतचाऱ्या सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. नादुरूस्त शेतचाऱ्यातून पाणी पुरवठा केला जाणार नाही. शेतचारी अभावी पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.
 नियमाप्रमाणे मागणी न करता पिकास पाणी घेतलेले आढळल्यास पाणी वापर अनधिकृत समजून उभ्यापिकाच्या क्षेत्राचा अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येईल.मंजूर उपसा धारकांव्यतिरिक्त इतरांनी इलेक्ट्रीक मोटार,ऑईल इंजिन अथवा पाईप लाईनने पाणी घेतल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यानुसार साहित्य जप्त करून कार्यवाही करण्यात येईल.

 उपलब्ध  पाण्यापेक्षा पाणी मागणी जास्त असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.

Monday 7 November 2016

राज्य हौशी नाट्यस्पर्धा

नाशिक येथे राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे आयोजन

नाशिक, दि. 7 :- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे  आयोजन 7 ते 24 नोव्हेंबर 2016 या कालावधीत करण्यात आले आहे.
नाट्यस्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण रोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देतानाच राज्यात नाट्यकलेच्या प्रचारप्रसारातून सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील अक्षरा क्रिएशनच्या  चिं.त्र्य. खानोलकर लिखीत व नाना देवरे दिग्दर्शित रखेली हे नाटक सादर होईल.  दि. 8 रोजी धुळे येथील चैतन्य बहुउद्देशीय संस्थेचे प्रभाकर दुपारे लिखीत व मार्टिन खैरनार दिग्दर्शित विदूषक’, दि. 9 रोजी नाशिक येथील दीपक मंडळाचे आदिल शेख लिखीत व अमित शिंगणे दिग्दर्शित मोगुलअशी नाटके होणार आहेत.
 दि. 10 रोजी गिरीधरलिला प्रोडक्शनचे राजेंद्र पोळ लिखीत व भगवान देवकर दिग्दर्शित फ्रेंडशीप’, दि. 11 रोजी गोसावी बहुउद्देशीय संस्थेचे गिरीष जोशी लिखीत व राजेश शर्मा दिग्दर्शित फायनल ड्राफ्टदि. 13 रोजी नाशिक येथील एच...डब्लू.आर.सी. रंगशाखाचे संदेश सावंत लिखीत व दिग्दर्शित मामला चोरीचा की?’, दि. 14 रोजी कवि नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे अमेय दक्षिणदास लिखीत व रविकांत शार्दुल दिग्दर्शित द कॉन्शस’, दि. 15 रोजी  लोकहितवादी मंडळाचे भगवान हिरे लिखीत व महेंद्र चौधरी दिग्दर्शित   अनफेअर डिल’, दि. 16 रोजी धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेचे बबन प्रभु लिखीत व मुकेश काळे दिग्दर्शित झोपी गेलेला जागा झाला’, दि. 17 रोजी नाशिक येथील मेनली ॲमॅच्युअर्सचे महेश डोकफोडे लिखीत व आदिती मोराणकर दिग्दर्शित गांधी हत्या आणि मीनाटक होणार आहे.
दि. 18 रोजी आर.एम. ग्रुपचे चेतन दातार लिखीत व प्रशांत हिरे दिग्दर्शित खेळ मांडियेला अर्थात अडलय माझं खेटर’, दि. 19 रोजी रंगकर्मी थिएटरर्सचे मयूर थोरात लिखीत व दिग्दर्शित ‘302 प्रश्नचिन्ह’, दि. 21 रोजी छत्रपती सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळाचे लक्ष्मण काटे लिखीत व प्रसन्न काटे दिग्दर्शित वावटळ’, दि. 22 रोजी शुक्ल यजुर्वेदीय मध्यदिन ब्राम्हण संस्थेचे योगेश सोमण लिखीत व विक्रम गवांदे दिग्दर्शित केस  नं. 99’, दि. 23 रोजी विजय नाट्यचे नेताजी भोईर लिखीत व  दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम् आणि दि. 20 रोजी  विद्ययवासिनी बालविद्या वि.शि. संस्थेचे रोहित पगारे लिखीत व दिग्दर्शित निशस्त्र योद्धा ही नाटके सादर होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी नाट्यकलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे,  असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.


0000000

Sunday 6 November 2016

सिंचनासाठी पाणी

सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.6 :-  नाशिक पाटंबधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गंगापुर डावा तट कालवा, गोदावरी उजवा, गोदावरी डावा तट कालवा, आळंदी कालवा, भोजापूर कालवा, कडक कालवा या ठिकाणावरून प्रवाही उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज जवळच्या सिंचन कार्यालयात
  10 नोव्हेंबर 2016 सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत दाखल करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          प्रकल्पात उपलब्ध पाणी विचारात घेऊन काही ठरावीक क्षेत्रात नमूना नंबर 7 प्रवर्गातील रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरीता विहीरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या हंगामी भुसार, फळबाग आणि बारमाही पिकांसाठी पाणी देण्याचे प्रस्तावीत आहे.
 शासन धोरणानुसार उपलब्ध पाणी उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरीत पाण्यात औद्योगिक कारखाने व शेतीच्या पिकासाठी पाणी पुरवठा करावयाचा असल्याने शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून पाणी पुरवठा करताना आवर्तन कालावधीत कमी-जास्त अंतर करून ते पुरवावे लागते. त्यामुळे पिकास अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही, तसेच त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही याचा विचार करूनच अर्ज सादर करावे.
 पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणी पुरवठा सुलभ व्हावा यादृष्टीने मंजूर क्षेत्रातील पिकांसाठी काटकसरीने पाणी घ्यावे. तसे न केल्यास पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या पिक नुकसानीची जबाबदारी ही शेतकऱ्याची राहील. त्यासाठी शासनाकडून भरपाई मिळणार नाही. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी  सुक्ष्म सिंचनावर भर  द्यावा. ज्या कालव्यावर अथवा चारीवर नमूना क्र.7 प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असेल तेथे सम प्रमाणात कपात करून मंजूरी देण्यात येईल.
सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रात नमुना क्र. 7 प्रवर्गात मंजूरी अनुज्ञेय राहणार नाही. संस्थेसही हंगामी भुसार, फळबाग आणि बारमाही पिकास पाणी पुरवठा करण्यात येईल. पाणी पुरवठा करण्याचे अगर नाकारण्याचे अधिकार क्षेत्रिय परिस्थीतीनुसार संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना राहतील. थकबाकीदार तसेच काळ्या यादीत  नाव असलेल्यांना मंजूरी दिली जाणार नाही. रब्बी मंजूरीच्या क्षेत्रातील नादुरूस्त पोटचाऱ्यामुळे पाणी पुरवठ्यास अडथळा आल्यास आणि पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे खात्याची राहणार नाही. मंजूर उपसा धारकांव्यतिरिक्त इतरांनी इलेक्ट्रीक मोटार,ऑईल इंजिन अथवा पाईप लाईनने पाणी घेतल्यास सिंचन अधिनियमानुसार साहित्य जप्त करून कार्यवाही करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.
------


Saturday 5 November 2016

‘समृद्धी-कृषी गौरव’ पुरस्कारांच्या वितरण

                 राज्यात नवे कृषी धोरण तयार आणणार- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

          नाशिक दि-5 : शेतकऱ्यांच्या उत्पादित  मालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्यापर्यंत शासनाच्या असलेल्या विविध योजना पोहोचाव्यात आणि कृषि क्षेत्रातील समस्या कमी व्हाव्यात यासाठी लवकरच सर्वांकष कृषी धोरण तयार करण्यात येईल, असे  प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांनी केले.

          ‘पूर्वा-कृषीदुत ग्राम समृद्धी-कृषी गौरव’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाला कृषी सभापती संजय चव्हाण, सहसंचालक डॉ. कैलास मोते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी.अे. जगताप, ग्राम समृद्धी फांऊडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बी.डी. पवार, संजय पाडोळ, मनोहर देवरे, नानासाहेब पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.फुंडकर म्हणाले,नवे धोरण  लागू करताना त्यात शेतकऱ्यांच्या विचारांचे प्रतिबिंब असेल. त्यासाठी शेतीशी संबंधीत विविध घटकांबाबत  शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल.  अनुभवी शेतकऱ्यांची याबाबतची मते मार्गदर्शक ठरू शकतील. केंद्राशी संबंधीत बाबींसाठी केंद्राकडे आग्रही भूमीका मांडण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. कृषी वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणे मार्च 2017 पर्यंत पुर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डाळींबाच्या नव्या वाणबाबत इस्राईल आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्यने संशोधन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही उत्पादन खुल्या बाजारातून घेण्याचे व त्याचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे, इतर राज्यातील चांगले तंत्रज्ञान राज्यात उपलब्ध करुन देणे आणि पीक विमा योजनेतील भरपाई देताना एकर ऐवजी उत्पन्न रकमेवर आधारीत देण्यासाठी निर्णय घेतले जातील, असे यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमानंतर श्री.फुंडकर यांनी आहेरगाव येथे द्राक्ष पॅकींग शेडला  भेट दिली.
0000000