Saturday 26 November 2016

वाहनाचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र

वाहनाचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत
          नाशिक दि.26 :-  मोटार वाहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी वाहनाचे वैध प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र मागितल्यानंतर प्रतिवेदीत दिनांकापासून वाहन मालकांना सात दिवसात प्रमाणपत्र सादर करता येईल. त्यासाठी कोणताही दंड लागू असणार नाही.
          वैध प्रमाणपत्र सात दिवसाच्या आत सादर न केल्यास 200 रुपये दंड आकरण्यात येतो. वाहन प्रदुषण चाचणीत वाहन सात दिवसाच्या आत पास न झाल्यास व तसे प्रमाणपत्र न सादर केल्यास  मालक व चालकास प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात येतो. रस्त्यावर फक्त पीयुसी प्रमाणपत्र सादर न केल्यास कोणताही दंड लागू असणार नाही याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.

------

No comments:

Post a Comment