Friday 4 November 2016

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतीसाठी 
सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
          नाशिक दि.4 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 ते 25 वयोगटातील युवकांची सैन्य व पोलिस प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
          निवडीसाठी उमेदवाराचा जातीचा दाखला आवश्यक आहे व तो नोकरी करीत नसावा. उमेदवारांची उंची पुरुषांसाठी 165 सें.मी. व महिलांसाठी 155 सें.मी. तर उमेदवारांची छाती पुरुषांसाठी 79 सें.मी. (फुगवून 84 सें.मी) असावी.  शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण असून जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 12 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, रहिवासी दाखला, सेवा योजने  कार्यालयांतर्गत नांव नोंदणी दाखला व ओळखपत्र  यांचे मूळ दाखले व सांक्षाकिंत प्रती सोबत असणे आवश्यक आहे. उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम  असावा आणि त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 1 लाखापर्यंत असावे.
          उमेदवारांनी अटी व शर्तीच्या अधिन राहून समाज कल्याण नाशिक, नासर्डी, नासर्डी पुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बी-विंग दुसरा मजला, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे 7 ते 9  नोव्हेंबर 2016 या कालावधीत सकाळी 4.00 वाजेपर्यंत स्वखर्चाने हजर रहावे. उमेदवारांना जाण्यायेण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्राची वाजे यांनी कळविले आहे.
                                                          *******

No comments:

Post a Comment