Sunday 6 November 2016

सिंचनासाठी पाणी

सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.6 :-  नाशिक पाटंबधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गंगापुर डावा तट कालवा, गोदावरी उजवा, गोदावरी डावा तट कालवा, आळंदी कालवा, भोजापूर कालवा, कडक कालवा या ठिकाणावरून प्रवाही उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज जवळच्या सिंचन कार्यालयात
  10 नोव्हेंबर 2016 सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत दाखल करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          प्रकल्पात उपलब्ध पाणी विचारात घेऊन काही ठरावीक क्षेत्रात नमूना नंबर 7 प्रवर्गातील रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरीता विहीरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या हंगामी भुसार, फळबाग आणि बारमाही पिकांसाठी पाणी देण्याचे प्रस्तावीत आहे.
 शासन धोरणानुसार उपलब्ध पाणी उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरीत पाण्यात औद्योगिक कारखाने व शेतीच्या पिकासाठी पाणी पुरवठा करावयाचा असल्याने शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून पाणी पुरवठा करताना आवर्तन कालावधीत कमी-जास्त अंतर करून ते पुरवावे लागते. त्यामुळे पिकास अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही, तसेच त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही याचा विचार करूनच अर्ज सादर करावे.
 पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणी पुरवठा सुलभ व्हावा यादृष्टीने मंजूर क्षेत्रातील पिकांसाठी काटकसरीने पाणी घ्यावे. तसे न केल्यास पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या पिक नुकसानीची जबाबदारी ही शेतकऱ्याची राहील. त्यासाठी शासनाकडून भरपाई मिळणार नाही. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी  सुक्ष्म सिंचनावर भर  द्यावा. ज्या कालव्यावर अथवा चारीवर नमूना क्र.7 प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असेल तेथे सम प्रमाणात कपात करून मंजूरी देण्यात येईल.
सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रात नमुना क्र. 7 प्रवर्गात मंजूरी अनुज्ञेय राहणार नाही. संस्थेसही हंगामी भुसार, फळबाग आणि बारमाही पिकास पाणी पुरवठा करण्यात येईल. पाणी पुरवठा करण्याचे अगर नाकारण्याचे अधिकार क्षेत्रिय परिस्थीतीनुसार संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना राहतील. थकबाकीदार तसेच काळ्या यादीत  नाव असलेल्यांना मंजूरी दिली जाणार नाही. रब्बी मंजूरीच्या क्षेत्रातील नादुरूस्त पोटचाऱ्यामुळे पाणी पुरवठ्यास अडथळा आल्यास आणि पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे खात्याची राहणार नाही. मंजूर उपसा धारकांव्यतिरिक्त इतरांनी इलेक्ट्रीक मोटार,ऑईल इंजिन अथवा पाईप लाईनने पाणी घेतल्यास सिंचन अधिनियमानुसार साहित्य जप्त करून कार्यवाही करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.
------


No comments:

Post a Comment