Monday 7 November 2016

राज्य हौशी नाट्यस्पर्धा

नाशिक येथे राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे आयोजन

नाशिक, दि. 7 :- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे  आयोजन 7 ते 24 नोव्हेंबर 2016 या कालावधीत करण्यात आले आहे.
नाट्यस्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण रोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देतानाच राज्यात नाट्यकलेच्या प्रचारप्रसारातून सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील अक्षरा क्रिएशनच्या  चिं.त्र्य. खानोलकर लिखीत व नाना देवरे दिग्दर्शित रखेली हे नाटक सादर होईल.  दि. 8 रोजी धुळे येथील चैतन्य बहुउद्देशीय संस्थेचे प्रभाकर दुपारे लिखीत व मार्टिन खैरनार दिग्दर्शित विदूषक’, दि. 9 रोजी नाशिक येथील दीपक मंडळाचे आदिल शेख लिखीत व अमित शिंगणे दिग्दर्शित मोगुलअशी नाटके होणार आहेत.
 दि. 10 रोजी गिरीधरलिला प्रोडक्शनचे राजेंद्र पोळ लिखीत व भगवान देवकर दिग्दर्शित फ्रेंडशीप’, दि. 11 रोजी गोसावी बहुउद्देशीय संस्थेचे गिरीष जोशी लिखीत व राजेश शर्मा दिग्दर्शित फायनल ड्राफ्टदि. 13 रोजी नाशिक येथील एच...डब्लू.आर.सी. रंगशाखाचे संदेश सावंत लिखीत व दिग्दर्शित मामला चोरीचा की?’, दि. 14 रोजी कवि नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे अमेय दक्षिणदास लिखीत व रविकांत शार्दुल दिग्दर्शित द कॉन्शस’, दि. 15 रोजी  लोकहितवादी मंडळाचे भगवान हिरे लिखीत व महेंद्र चौधरी दिग्दर्शित   अनफेअर डिल’, दि. 16 रोजी धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेचे बबन प्रभु लिखीत व मुकेश काळे दिग्दर्शित झोपी गेलेला जागा झाला’, दि. 17 रोजी नाशिक येथील मेनली ॲमॅच्युअर्सचे महेश डोकफोडे लिखीत व आदिती मोराणकर दिग्दर्शित गांधी हत्या आणि मीनाटक होणार आहे.
दि. 18 रोजी आर.एम. ग्रुपचे चेतन दातार लिखीत व प्रशांत हिरे दिग्दर्शित खेळ मांडियेला अर्थात अडलय माझं खेटर’, दि. 19 रोजी रंगकर्मी थिएटरर्सचे मयूर थोरात लिखीत व दिग्दर्शित ‘302 प्रश्नचिन्ह’, दि. 21 रोजी छत्रपती सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळाचे लक्ष्मण काटे लिखीत व प्रसन्न काटे दिग्दर्शित वावटळ’, दि. 22 रोजी शुक्ल यजुर्वेदीय मध्यदिन ब्राम्हण संस्थेचे योगेश सोमण लिखीत व विक्रम गवांदे दिग्दर्शित केस  नं. 99’, दि. 23 रोजी विजय नाट्यचे नेताजी भोईर लिखीत व  दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम् आणि दि. 20 रोजी  विद्ययवासिनी बालविद्या वि.शि. संस्थेचे रोहित पगारे लिखीत व दिग्दर्शित निशस्त्र योद्धा ही नाटके सादर होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी नाट्यकलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे,  असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.


0000000

No comments:

Post a Comment