Saturday 5 November 2016

चिल्ड्रन्स ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क

                      
अपघाती मृत्युचे प्रमाण कमी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग महत्वाचा
-         नितीन गडकरी
नाशिक, दि.5 :- रस्त्यांवरील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांमध्ये नागरीकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूतल परिवहन आणि जहाजबांधणी विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

चिल्ड्रन्स ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कच्या ट्रेनिंग हॉल, लायब्ररी व कार ड्रायव्हिंग सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सिमा हिरे महापौर अशोक मुर्तडक, नाशिक फर्स्ट उपक्रमाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आदी होते.

श्री. गडकरी म्हणाले अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते बांधणी अभियांत्रिकी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात आणि वेगाने सुधारणा करण्यात येत आहेत. वाहतूक कायद्यात सुधारणा करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी संगणकीय प्रणाली सोबत सी.सी.टि.व्ही. चा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि नागरीकांना वाहतूक नियमांबाबत जागरुक करण्याचा ट्रॅफिक पार्कचा उपक्रम अतिशय चांगला असून संस्थांच्या पातळीवरुन होणाऱ्या अशा उपक्रमांना सहाय्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले
याप्रसंगी त्यांनी ट्रॅफिक पार्क, प्रशिक्षण सभागृह व लायब्ररीचे पाहणी केली. अध्यक्ष श्री.कुलकर्णी यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली.  
000000

No comments:

Post a Comment