Saturday 5 November 2016

‘समृद्धी-कृषी गौरव’ पुरस्कारांच्या वितरण

                 राज्यात नवे कृषी धोरण तयार आणणार- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

          नाशिक दि-5 : शेतकऱ्यांच्या उत्पादित  मालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्यापर्यंत शासनाच्या असलेल्या विविध योजना पोहोचाव्यात आणि कृषि क्षेत्रातील समस्या कमी व्हाव्यात यासाठी लवकरच सर्वांकष कृषी धोरण तयार करण्यात येईल, असे  प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांनी केले.

          ‘पूर्वा-कृषीदुत ग्राम समृद्धी-कृषी गौरव’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाला कृषी सभापती संजय चव्हाण, सहसंचालक डॉ. कैलास मोते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी.अे. जगताप, ग्राम समृद्धी फांऊडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बी.डी. पवार, संजय पाडोळ, मनोहर देवरे, नानासाहेब पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.फुंडकर म्हणाले,नवे धोरण  लागू करताना त्यात शेतकऱ्यांच्या विचारांचे प्रतिबिंब असेल. त्यासाठी शेतीशी संबंधीत विविध घटकांबाबत  शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल.  अनुभवी शेतकऱ्यांची याबाबतची मते मार्गदर्शक ठरू शकतील. केंद्राशी संबंधीत बाबींसाठी केंद्राकडे आग्रही भूमीका मांडण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. कृषी वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणे मार्च 2017 पर्यंत पुर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डाळींबाच्या नव्या वाणबाबत इस्राईल आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्यने संशोधन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही उत्पादन खुल्या बाजारातून घेण्याचे व त्याचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे, इतर राज्यातील चांगले तंत्रज्ञान राज्यात उपलब्ध करुन देणे आणि पीक विमा योजनेतील भरपाई देताना एकर ऐवजी उत्पन्न रकमेवर आधारीत देण्यासाठी निर्णय घेतले जातील, असे यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमानंतर श्री.फुंडकर यांनी आहेरगाव येथे द्राक्ष पॅकींग शेडला  भेट दिली.
0000000

No comments:

Post a Comment