Saturday 5 November 2016

जिल्हास्तरीय कृषी आढावा बैठक

शेतकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करा
                                                      -कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

 नाशिक, दि. 05-शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी प्रत्यक्षात  शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्याचाआणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रयत्न करा, असेआवाहन कृषि व फलोत्पादन ,पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकित ते बोलेत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ.कैलास मोते, प्रादेशिक विभागीय प्रशिक्षण केंद्र (रामेती) प्रमुख प्रा.सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक (आत्मा) अशोक कांबळे, सुभाष नागरे, डॉ.विजय पाटील आदी उपस्थित होते.

श्री.खोत म्हणाले, कृषी विभाग हा शेतकऱ्याला सर्वाधिक जवळचा वाटणारा विभाग आहे. म्हणून शेती व शेतकऱ्याचा विकासाला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी  नाविन्यपूर्ण काम केलेल्या गावात जाऊन शेतीवरचे मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करावे. पीक पध्दतीचे नियोजन नव्याने करुन संधोधन केंद्राच्या बाबतीत नव्या वाणाचे संशोधन महत्वाचे आहे.बियाणांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता बियाणांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. शेती विकासाचा आराखडा गावाकडूनच तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  नाशिकचा कांदाचाळीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत कृषि विकास अधिकारी हेमंतकाळे यांनी कृषि विभागाच्या कामकाजाची माहिती सादरी करणाद्वारे दिली.
बैठकिस नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

                         शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांना वाजवी दर मिळण्यास मदत होणार
 थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत संत शिरोमणी  सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव, आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला मिळवून देण्यासाठी मदत होणार असल्याचेराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

  पणन मंडळाच्या आढावा बैठकित ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ.कैलास मोते, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहिरे  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment