Thursday 10 November 2016

गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन

गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.10 :-  गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या हातगाव-1, खडकीसिम, वाघळा-1, ब्राम्हणशेवगा, पिंपरखेड, कुंझर-2, वाघळा-2, वलठाण, राजदेहरे, देवळी भोरस, कृष्णापुरी ता.चाळीसगाव पथराड ता. भडगाव तसेच म्हसवा, शिरसमणी, सावरखेडा ता.पारोळा, मन्यारखेडा, विटनेर ता.जळगांव व पदमालय खडकेसिम ता.एरंडोल लघु प्रकल्पावरुन काल्याद्वारे कालवाप्रवाही, कालवाउपसा, जलाशयउपसा लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरून उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहीरीवरून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या लाभधारकांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2016 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          यावर्षी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत गहु, हरबरा, ज्वारी, हा.दुरी, दादर, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला आदी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी 2015-16 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी. भरणा उडाफ्याचा व पाटमोट संबध नसावा.  प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या सलग क्षेत्रास मंजुरी देण्यात येईल. उडाफ्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये.
          शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय संबंधीत पाटशाखेत किंवा ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देताना सातबारा उतारा अथवा खाते पुस्तिका पाटशाखेत दाखवावी लागेल. अटींच्या पुर्ततेसह नमुना नं 7, 7अ आणि 7ब पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2016 नंतर वाढविली जाणार नाही.
          पिण्याचे पाण्याचे आरक्षण किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. मंजूरी पाटबंधारे अधिनियमानुसार राहणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करून अधिकाधीक लाभधारकांनी पाण्याचा  लाभ घ्यावा,  असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
         

                                                +++

No comments:

Post a Comment