Tuesday 20 December 2016

पुर्वचारित्र्य पडताळणी ऑनलाईन यंत्रणेचे उद्घाटन

वर्तन व पुर्वचारित्र्य पडताळणी ऑनलाईन यंत्रणेचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

         
नाशिक दि.20 :- महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चारित्र पडताळणी सेवेच्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन राज्याचे  वैद्यकिय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर आमदार बाळासाहेब सानप, डॉ.राहुल हिरे, अपूर्व हिरे, अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस महासंचालक विजयकुमार चौबे, पोलिस अधिक्षक अकुंश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.महाजन म्हणाले,वर्तन व पुर्वचारित्र्य पडताळणी ऑनलाईन झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार असून त्यांचे शारिरीक श्रम व खर्च कमी होणार आहे. चारित्र्य पडताळणी अहवाल आज शासकीय सेवेत व इतर अनेक ठिकाणी आवश्यक आहे. ऑनलाईन सुविधेमुळे चारित्र्य पडताळणी अहवाल मिळविताना नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या गैरसोय  दूर होऊन त्यांच्या समस्यासदेखील कमी होतील.
श्री.शिंदे प्रास्ताविकात म्हणाले, नाशिक जिल्ह्यात दरवर्षी वर्तन व पुर्वचारित्र्य पडताळणी 15 हजार प्रकरणे सादर होत असतात. या कामाला गती देण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी  वर्तन व पुर्वचारित्र्य पडताळणी ही सेवा ऑनलाईन असणे आवश्यक होते. पुर्वचारित्र्य पडताळणीच्या ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्याला ऑनलाईन वर्तन व पुर्वचारित्र्य पडताळणीचा अहवाल  पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते देण्यात आला.

***********

No comments:

Post a Comment