Monday 26 December 2016

नाशिक पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण

  राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित
सैय्यद पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

            नाशिक, दि.26:- सैय्यद पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित झाले.
 याप्रसंगी आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार योगेश घोलप, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले, गट विकास अधिकारी पी.एस. कोल्हे यांची प्रमख उपस्थिती होती.   
सैय्यद पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत विंचुर गळवी, सुलतानपुर, ओढा, माडसांगवी, लाखलगाव आणि शिलापूर या गावांतील लोकसंख्येला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत दोन वैद्यकिय अधिकारी आणि दोन आरोग्‌य सहाय्यकांसह 14 कर्मचारी येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या असून कुटुंब नियोजन, अंधत्व निवारण सह विविध आजारांवर उपचार केले जातील.
                   नाशिक पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण


श्री.भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे आमदार, योगेश घोलप, पंचायत समिती सभापती  मंदाताई निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment