Tuesday 27 December 2016

नॉयलॉन दोरा विक्रीवर बंदी

                                        नॉयलॉन दोरा,निर्मिती,विक्री व वापरावर बंदी
       नाशिक, दि.27:- मकर संक्रांतीनिमित्त नाशिक शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा(दोरा) निर्मिती, विक्री व वापरावर  परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढलेल्या आदेशान्वये 20 जानेवारी 2017  पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
          मांजा नॉयलॉन स्वरुपात येत असल्याने त्यापासून  वन्य पक्ष्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन जखमी/मृत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास  आले आहे. म्हणून नाशिक शहरात खबरदारीचा उपाय म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार नॉयलॉन दोरा,निर्मिती,विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता-1960 या कायद्याच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
                                               ************

No comments:

Post a Comment