Wednesday 14 December 2016

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
          नाशिक दि.14 :-  प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अतंर्गत असलेल्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनातंर्गत विविध प्रशिक्षण, स्वयंरोजगार व विकासाच्या योजनांतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून व लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
          केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत निवडक आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकिय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा पुर्व सी.ई.टी. प्रशिक्षण देणे, निवडक आदिवासी विद्यार्थ्यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण देणे, आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर कांडप यंत्रासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर ग्रामपंचायत/बचत गटांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच साठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी युवकांना बांधकाम साहित्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे, आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर hdpe ताडपत्री साठी अर्थसहाय्य करणे, शिवणकला प्रशिक्षण झालेल्या आदिवासी महिलांना शिलाई मशिनसाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या आदिवासी युवकांना 85 टक्के अनुदानावर इलेक्ट्रीक (किट) साहित्यासाठी अर्थसहाय्य करणे. विविध व्यवसायासाठी आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे, आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी सेंद्रीय खते व परंपरागत बि-बियाणाचा 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी पांरपारिक लोककला जतन करण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे दाखले तयार करणेसाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासींचे घरात 2.5 पॉईंट विद्युत फिटींग करणे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
          तर कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत आदिवासी युवक व युवतींना सुरक्षा रक्षक, सिक्युरिटीगार्ड, , आदिवासी  लाभार्थ्यांना बेसिक इंडस्ट्रीयल टेक्नॉलाजी ,  आग आणि सुरक्षा क्षेत्र, एल.ई.डी बल्ब, हॉस्पिटलचे प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करुन देणे, आदिवासी युवक /युवतींना वॉर्डबॉयचे प्रशिक्षण, आदिवासी  युवतींना नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण ,आदिवासी  लाभार्थ्यांना मोटार मॅकेनिकचे  प्रशिक्षण ,आदिवासी  युवक/युवतींना अकाऊंट, असिस्टन्ट,टॅली संगणकाचे  प्रशिक्षण  आदी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
          इच्छुक व पात्रता धारक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी /लाभार्थ्यांनी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणासाठी /योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह सैन्य व पोलीसदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पेठरोड येथे 16 डिसेंबर 2016 ते 20 डिसेंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत.
प्रशिक्षणासाठी ,योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकल्प कार्यालयात लावण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी 3 टक्के महिला व अपंगाना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षणास निवड झाल्यानंतर प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही. प्रकल्प क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीतून अपेक्षित उमेदवार प्राप्त झाले नाही तर प्रशिक्षण संस्था व प्रकल्प अधिकारी उमेदवारांची निवड मागणी नुसार करण्यात येईल.
          अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी  तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प,नाशिक कार्यालयात संपर्क साधावा.

*********

No comments:

Post a Comment