Friday 23 December 2016

नाशिक स्पोर्ट फेस्टीव्हल

              नाशिक स्पोर्ट फेस्टीव्हलला उत्साहात सुरुवात
                    
 ­नाशिक, दि. 23:- जिल्हा प्रशासन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक स्पोर्ट फेस्टीव्हलला  अंजनेरी येथील ट्रेकींग स्पर्धेने उत्साहात प्रारंभ झाला. ट्रेकींगमध्ये  सहभागी होणाऱ्या नागरीकांना जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या.

आज पहाटेपासून नाशिककर मोठ्या संख्येने ट्रेकींगसाठी अंजनेरी येथे दाखल झाले होते. अंजनेरी ट्रेकसाठी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनीस, विविध क्षेत्रातील मान्यवर, शालेय- महाविद्यालय विद्यार्थी, युवक, विविध उद्योग, व्यवसायातील कर्मचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळापासून सुरु झालेल्या या ट्रेकींगमध्ये 1100 पेक्षा जास्त नागरीकांनी सहभाग घेतला.

          पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात बोटींग क्रीडा प्रकारातील गोदावरी जलदिंडीचे आयोजन करण्यात आले. जलदिंडीचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा रिओ ऑलिंम्पिकपटू दत्तू भोकनळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू वैशाली तांबे, , जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनीस, बोट क्लबचे अध्यक्ष विक्रांत मते यांच्या उपस्थितीत झाली. जलदिंडीचे नेतृत्व श्री. भोकनळ यांनी केले त्यांनी कयाकिंग प्रकारातील के-1 ही बोट वल्हवली. आसारामबापू पूल येथील बोट क्लब ते व्हिक्टोरीया पूल येथून जलमार्गक्रमण करीत के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या बोट क्लब येथे जलदिंडीचा समारोप समारोप. यामध्ये कयाकींग, कनायिंग आणि रोईंग प्रकारातील सत्तर बोटींग संघ सहभागी झाले होते..   
विविध खेळ प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकमत यांच्या वतीने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून यामध्ये ट्रेकींग, बोंटींग, सायकलींग आणि मॅरेथॉनचे योजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी गोल्फ क्लब येथे सकाळी 7 वाजता सायकलींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment