Sunday 25 December 2016

पुतळा लोकार्पण सोहळा

महात्मा ज्योतिबा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुर्णकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

नाशिक दि.25- महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण आगर टाकळी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, उपमहापौर गुरमित बग्गा, खासदार हेमत गोडसे, राजीव सातव, माजी मंत्री बाळासाहेब थोरात , चंद्रकांत हांडोरे, शोभाताई बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, माजी महापौर अशोक दिवे, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.शिंदे म्हणाले, पुतळ्यांच्या माध्यमातून विचारांची प्रेरणा समाजाला मिळत असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारांचे गुरु म्हणुन महात्मा फुले यांना मानत होते. या शिल्पकृतीच्या माध्यमातून गुरुशिष्याचे विचार समाजाला प्रेरणा देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नव्या पिढीला महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडक यांचे विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार होण्यास भव्यदिव्य स्वरुपात असणारे पुतळे नक्कीच मार्गदर्शक ठरतील, असे मत श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केले.

*********

No comments:

Post a Comment