Wednesday 28 December 2016

जिल्हा विकास समन्वयन आणि संनियंत्रण समिती बैठक

जिल्ह्यातील विकास कामांसाठी केंद्र सरकारचा मोठा आर्थिक निधी
                -डॉ.सुभाष भामरे




नाशिक, दि.28 :- रेल्वे, रस्ते प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने मोठा आर्थिक निधी उपलब्ध केला असून जिल्ह्यातील पायाभूत विकासाला यामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज केले.
           जिल्हा विकास समन्वयन आणि संनियंत्रण समितीची बैठक डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, येवल्याचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, बागलाणचे नगराध्यक्ष सुनिल मोरे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता पाटील, दिंडोरीच्या अलका चौधरी, अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र जगताप आदी उपस्थित होते.
          केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, केंद्र सरकारने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह नवीन रेल्वेमार्गांच्या कामांना मंजूरी दिली आहे. यामध्ये  मनमाड-मालेगाव-धुळे मार्गे इंदोर या रेल्वेमार्गासाठी रेल्वे खात्याने 5 हजार कोटी रुपयांच्या तरतूद केली आहे. उर्वरित 5 हजार कोटी रुपयांचा निधीसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडीयाच्या सहकार्याने स्वतंत्र कंपनीची स्थापना करुन त्यामाध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चा मालेगाव ते दोंडाईचा हा टप्पा चार पदरी करणे , साक्री ते चांदवड हा महामार्ग चार पदरी करणे आणि पुणे-नाशिक महामार्गाचे काम पूर्ण करणेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना, उमेद, ग्रामिण जिवनोन्नती अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान पीक विमा योजना यासह विविध विभागांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या कार्यवाहीची माहिती घेतली. कृषि, जलसिंचन, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकासाच्या उपक्रमांबाबत शासन संवेदनशिल असून समाजातील विविध घटकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याचे डॉ. भामरे यांनी निर्देश दिले.  
याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विकास कामांमधील अडचणी व विविध नगरपरिषदांच्या नागरी सुविधांच्या गरजांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध शासकिय प्रमुख अधिकाऱ्यांनी विभागांच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती सादर केली. बैठकीस रेल्वे, भारत संचार निगम लिमिटेड, भारत पेट्रोलियम, महावितरण यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी
00000




No comments:

Post a Comment