Wednesday 8 March 2017

महिला मतदार नोंदणी

महिला मतदार नोंदणीस चांगला प्रतिसाद

नाशिक, दि. 8:- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त सुरू असलेल्या विशेष महिला मतदार नोंदणीस पहिल्या दिवशीच  चांगला प्रतिसाद मिळाला असून  1635 महिलांनी मतदार  नोंदणी केली आहे. 832 पुरुष मतदारांचीदेखील नोंदणी यावेळी करण्यात आली.

मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी एकूण 40 नागरिकांनी नमुना क्रमांक 7 सादर केला. तर मतदार यादीतील नावे बदलण्यासाठी 198 महिला मतदारांनी नमुना 8,  तर मतदारसंघांतर्गत पत्ता बदलण्यासाठी 46 महिलांनी नमुना 8-अ सादर केला. सर्वाधीक मतदार नोंदणी नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव मध्य या मतदार संघात झाली आहे.
महिला मतदार नोंदणी तहसील कार्यालयात 10 मार्च 2017 अखेर संध्याकाळी 5 पर्यंत सुरू राहणार असून महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

      00000

No comments:

Post a Comment