Friday 10 March 2017

सिंचनासाठी मागणी अर्ज-ओझरखेड

                                  सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.10 :-  उर्ध्व गोदावारी प्रकल्पातंर्गत असलेल्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगांव डावा कालवा कि.मी. 0 ते 25 तसेच ओझरखेड, तिसगांव व पुणेगांव धरणाचे फुगवट्यातील तसेच लघु प्रकल्प-जांबुटके व खडकमाळेगांव प्रकल्पावरील पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पाणी वापर संस्थांनी व नमुना नं.7 चे मागणीधारकांनी अर्ज 20 मार्च सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळच्या शाखा कार्यालयात दाखल करावे, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
           प्रकल्पावरील दिर्घ मुदतीच्या उपसा सिंचन पाणी वापर संस्थांना उन्हाळ हंगामात संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याच्या कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही याची सर्वसंबधितांनी दक्षता घ्यावी.  अधिक पाणी लागणाऱ्या पीकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधीताची राहील.
पाणी मागणी अर्ज दाखल करताना संबंधीत पाणी वापर संस्थेने सर्व थकबाकी भरणे आवश्क आहे. पाणी वापर संस्थांनी त्यांच्या हद्दीतील शेतचाऱ्या सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. नादुरूस्त शेतचाऱ्यांमधून पाणी पुरवठा केला जाणार नाही. शेतचारी अभावी पाणी न मिळाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाहीपाणी अर्जासोबत चालू वर्षाचा सातबारा उतारा जोडणे अनिवार्य राहील. पाणी मागणी अर्ज नुमना नं. 7 वर विहीत मुदतीत दाखल करणे आवश्यक आहे. मागणी न करता क्षेत्रातील पीकास पाणी घेतल्याचे निदर्शनास आल्यास पाणी वापर अनधिकृत समजून उभ्या पिकांच्या क्षेत्राचा अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येईल.
जलाशय नदी काठावर कोणीही अनधिकृत  लाभधारकाने इलेक्ट्रीक मोटारी अथवा ऑईल इंजिन ठेवून वा पाईप अर्थात डोंगळे टाकून पाणी घेण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यान्वये साहित्य जप्त करण्यात येईल. उपलब्ध पाण्यापैकी बिगर सिंचन पाणी वापर आरक्षण वजा जाता उन्हाळ हंगामाचे सिंचनासाठी निर्धारीत केलेल्या जाण्यापेक्षा जादा मागणी दाखल झाल्यास त्या प्रमाणात मागणी क्षेत्रात कपात करण्यात येईल.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून अन्यधान्याचे उत्पादन वाढवावे,  असे आवाहन उपकार्यकारी अभियंता ,पालखेड पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

*********

No comments:

Post a Comment