Friday 10 March 2017

आयुष उपचार शिबीर

14 मार्च रोजी मोफत आयुष उपचार शिबीर

नाशिक, दि.10 -  राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष विभाग व जिल्हा एकात्मिक आरोग्‍य व कुटुंब कल्याण सोसायटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय नाशिक येथे 14 मार्च 2017 रोजी सकाळी 9 ते  दुपारी 1 या वेळेत आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग , निसर्गोपचार आणि सिद्ध आदी वैद्यक उपचारांचा समावेश असलेले मोफत आयुष निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात बालकांचे विकार, स्त्रियांचे विकार, वृद्धांचे विकार, श्वसन विकार, पचन संस्थेचे विकार, हाडांचे विकार, त्वचा विकार व ॲलर्जी आणि जुन्या आजारांवर तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत उपचार करण्यात येणार आहेत. आयुर्वेदीक पंचकर्म व युनानी इलाज-बीद-तदबीर सेवा उपलब्ध असणार आहे. गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ एस.पी. जगदाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment