Tuesday 21 March 2017

‘समृद्धी’साठी मोजणी

 ‘समृद्धी’साठी मोजणीचे काम महसूल आणि पोलीसांच्या समन्वयाने
                                                                                                       -राधाकृष्णन बी.


नाशिक दि.21 :- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीच्या कामात व्यत्यय येऊ नये आणि हे काम कायदेशिररित्या व्हावे यासाठी महसूल आणि पोलीस विभागाच्या समन्वयाने करण्यात यावे, यासाठी पोलीसांनी मोजणीच्या कामात सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी दिल्या.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक गिरे आणि दत्तात्रय घोगरे आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांशी चर्चा करून सामंज्यस्याने मोजणीचे काम करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment