Tuesday 21 March 2017

जलजागृती सप्ताह

     पिकाला मोजून पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी स्विकारावी
                                                                             -प्रा.अशोक सोनवणे

नाशिक, दि.21:- भौगोलिक परिस्थितीनुसार पीक पद्धतीचा वापर करुन शेतकऱ्याने प्रत्येक पिकाला मोजून पाणी देण्याची व्यवस्था ‍स्विकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलअभ्यासक प्रा.अशोक सोनवणे यांनी केले.

जलजागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता आर. एम. मोरे, आदी उपस्थित होते.

श्री.सोनवणे म्हणाले, संरक्षित सिंचन, हंगामी पीकपद्धती, सूक्ष्म सिंचन आणि पाणी मोजणे ही उत्पादकता वाढीचे साधने आहेत. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्याने विहीरींची निर्मिती वाढविली, तसेच वीज सुलभतेने उपलब्ध झाल्याने मोटारींचे संख्या वाढली.  भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढून  पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे  त्यांनी  सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांनी स्त्रालसारख्या देशाचा आदर्श घेऊन पाणी वापराच्या पद्धतीत बदल करायला हवा.  येणाऱ्या काळात पाण्याचे स्रोत वाढविण्याबरोबर पाणी वापरण्याची सुत्रेही तयार करणे आवश्यक आहे. पाण्याचा गैरवापर होऊ नये यासाठी जलजागृती सप्ताहसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यातील विविध भागात पावसाचे असंतुलित प्रमाण आणि मर्यादीत कालावधीतील पावसाळा लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापर करणे गरजेचे आहे, श्री.मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

***********



No comments:

Post a Comment