Tuesday 14 March 2017

कृषी महोत्सव

नाशिक येथे एप्रिलअखेर कृषीमहोत्सवाचे आयोजन


नाशिक, दि.14 -  कृषीक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक येथे एप्रिल अखेर ‘महाकृषी महोत्सव 2017’ चे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, प्रकल्प उपसंचालक प्रमोद वानखेडकर, कृषि विकास अधिकारी हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आदी उपस्थित होते.
 प्रदर्शनात विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स, कृषी प्रक्रीयेशी संबंधीत विविध कंपन्यांचे स्टॉल्स,  एकात्मिक शेती संकल्पनेवर आधारीत प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे, यशस्वी महिला शेतकऱ्यांची व्याख्याने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता खरेदीदार संमेलन, धान्य महोत्सव आदी विविध  उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
          कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार असल्याने अधिकाधीक शेतकऱ्यांपर्यंत प्रदर्शनाची माहिती पोहोचवावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीत प्रदर्शनाच्या प्राथमिक नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

----

No comments:

Post a Comment