Friday 10 March 2017

बचतगट प्रदर्शन समारोप

विभागीय महिला बचतगट प्रदर्शनाचा समारोप

तब्बल एक कोटी 17 लाखांची विक्री

नाशिक, दि.10 - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे  आयोजित विभागीय महिला बचत गट प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सात दिवसांत एक कोटी सतरा लाख चाळीस हजार किमतीच्या बचतगटांच्या उत्पादनांची विक्री झाली.
डॉ.जया डवले, एन. शांती राधाकृष्णन आणि संगीता  बगाटे  यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी बचतगटांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  गेल्या 4 मार्चपासून सुरू असलेल्या प्रदर्शनात कळवण येथील प्रेरणा बचत गटाच्या स्टॉलवर सर्वाधिक 2 लाख 34 हजार 500 रूपयांची विक्री झाली.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोप कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी सहायक प्रकल्प संचालक डॉ संजय माळी, विजया शिरसाठ तसेच नाशिक जिल्हा  ग्रामीण  विकास यंत्रणेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment