Tuesday 9 October 2018

स्टार्टअप इंडिया यात्रा


नाविन्याच्या शोधासाठी ‘स्टार्टअप यात्रेचे आयोजन-संपत चाटे
          नाशिक, 9 : विद्यार्थ्यांमधील नाविन्यपुर्ण संकल्पनाची ओळख होण्यासाठी उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र राज्‍य नाविन्यता सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप इंडिया’ यात्रेच्या माध्यमातून भविष्यात नवउद्योजक निर्माण होण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळेल, असा विश्वास जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संपत चाटे यांनी व्यक्त केला.
          के.के.वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथील ‘महाराष्ट्र स्टार्टअप इंडिया’ यात्रेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकासचे उपसंचालक सुनिल सैंदाने, इंजिनिअर क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.माथुर, महाविद्यालयाचे सदस्य अजिंक्य वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, विभागप्रमुख चारुदत्त मसदे, प्रा.डॉ.प्रमोद शहाबादकर आदी उपस्थित होते.
          श्री.चाटे म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप व्हॅन, बूट कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उद्योजकतेविषयी  माहिती देण्यात येणार आहे. शासनाने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नाविन्यपुर्ण सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेवून उद्योजक बनावे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यानी नाविन्यपूर्ण व्यवसाय बद्दल विविध संकल्पनांचे सादरीकरण केले.
00000

No comments:

Post a Comment