Friday 12 October 2018

आपत्ती निवारण रॅली


आपत्ती निवारण  चित्ररथाचा शुभारंभ

          नाशिक दि.12- आपत्ती निवारण सप्ताहनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनजागृती चित्ररथ आणि रॅलीचा शुभारंभ महसुल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी निवासी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, पोलीस निरीक्ष सीताराम कोल्हे आदी उपस्थित होते.

          यावेळी कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कुलच्या विद्यार्थीनींनी  पुरपरिस्थितीतील आपत्ती व्यवस्थापनाबाबत पथनाट्य सादर केले. श्री.स्वामी यांनी  चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
   चित्ररथासमवेत आपत्ती निवारण वाहन, रुग्ण्वाहिका, वाहतुक पोलीसांच्या वाहनाचा समावेश होता. रॅलीत एचपीटी व आरवायके कॉलेज, बीवायके कॉलेज सिन्नर, मराठा विद्याप्रसारक समाजाचे फार्मसी कॉलेज, एमएमआरके महिला महाविद्यालय, नामको नर्सिग कॉलेज आदी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. एमजी रोड, शालिमार, जि.प. मार्गे  जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.
000

No comments:

Post a Comment