Friday 12 October 2018

न्युट्री नेशन मीठ वाटप


लोह व आयोडिनयुक्त न्युट्री नेशन मीठ वाटप योजनेचा शुभारंभ

       नाशिक दि.12- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव धान्य दुकानांमार्फत लोह व आयोडिनयुक्त मीठ वाटप योजनेचा नाशिक विभागातील शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपायुक्त प्रविण पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, टाटा ट्रस्टचे प्रमुख गणेश अय्यर आदी उपस्थित होते.

          महिलांना केंद्रबिंदु मानुन त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोह आणि आयोडिनयुक्त न्युट्री नेशन मीठ वाटप करण्यात येणार आहे. हे मीठ रास्तभाव दुकानांमध्ये 14 रुपये प्रतिकिलो प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. न्युट्री नेशन हे मीठ महिलांमधील रक्ताक्षयाची कमी, अशक्तपणा यासाठी उपयुक्त आहे. जगातील सर्व सामाजिक, आर्थिक गटातील लोक वर्षभर मिठाचा वापर करतात. मीठ हे स्वयंपाक करण्याचा मुलभूत घटक आहे त्यामुळे बालक, प्रौढ, जेष्ठ नागरिक , महिला यांच्या सुदृढ आरोग्यासाठी न्युट्री नेशन मीठ अत्यंत फायदेशीर असल्याचे श्री.बापट यांनी  यावेळी सांगितले.
          सदर कार्यक्रमांतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात महिला व रास्तभाव दुकानदार यांना या मीठाचे वाटप करण्यात आले.
000

No comments:

Post a Comment