Tuesday 13 November 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग


महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा अंदाजित वेळापत्रक जाहीर
       नाशिक दि.13 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा 19 जानेवारी 2019 रोजी होईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा  17 फेब्रुवारी 2019 रोजी तर मुख्य परीक्षा 13, 14 व 15 जुलै 2019 दरम्यान होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्च 2019 रोजी होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक 28 जुलै 2019 रोजी, पोलीस उप निरीक्षक पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन  11 ऑगस्ट 2019 रोजी,  सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन 25 ऑगस्ट 2019 रोजी होईल.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परिक्षा 31 मार्च 2019 तर मुख्य परीक्षा 7 जुलै 2019 रोजी होईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 7 एप्रिल 2019 तर मुख्य परीक्षा 18 ऑगस्ट 2019 रोजी होईल.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा 28 एप्रिल 2019 रोजी तर मुख्य परीक्षा  1 सप्टेंबर 2019 ,  महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा 19 मे  रोजी तर मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2019 होईल. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 26 मे रोजी तर मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2019 होईल आणि महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 16 जून 2019 रोजी होईल.
 महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक 6 ऑक्टोबर 2019 रोजी, लिपिक टंकलेखक महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन 13 ऑक्टोबर 2019, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन 20 ऑक्टोबर 2019 आणि कर सहायक महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन 3 नोव्हेंबर 2019 रोजी होईल.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 23 जून 2019 रोजी होईल. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2 नोव्हेंबर, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षाची मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी होईल.
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 1 डिसेंबर, राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा 8 डिसेंबर आणि महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची मुख्य परीक्षा 15 डिसेंबर 2019 रोजी होईल.
          संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व अद्ययावत करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकात कोणताही बदल होऊ शकतो. त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाचे उपसचिव सुनिल अवताडे यांनी कळविले आहे.
----

No comments:

Post a Comment