Tuesday 13 November 2018

एमएसएमई


एमएसएमई योजना यशस्वी करण्यासाठी चांगले  नियोजन करा-जिल्हाधिकारी

          नाशिक दि.13- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देवून देशाच्या अर्थव्यस्थेला सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने एमएसएमई योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि अधिकाधीक उद्योजकांना योजनेचा लाभ देण्यासाठी उत्तम नियोजन आणि समन्वय साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँक सभागृहात आयोजित एमएसएमई विशेष कर्ज योजनाच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक विजय श्रीवास्तव, लिड बँक व्यवस्थापक भरत बर्वे तसेच विविध बँकेचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, योजनेची माहिती उद्योजकापर्यंत पोहचविण्यासाठी उद्योजकांशी संपर्क साधण्यात यावा. तसेच कार्यशाळेचे आयोजन करून उद्योजकांना प्रोत्साहित करावे. योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा आणि उद्योजकांच्या समस्या तत्काळ सोडवून योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
श्री. श्रीवास्तव म्हणाले,  एमएसएमई योजनेअंतर्गत छोट्या आणि मध्यम उद्योगांना सर्वात कमी व्याजदर तसेच सीजीटीएमएसई कव्हर अंतर्गत एक कोटी पर्यंत अतिरिक्त तारणमुक्त कर्ज तात्काळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment