Sunday 25 November 2018

लेखा व कोषागारे क्रीडा स्पर्धा


लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

          नाशिक दि.25- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती आयोजित नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक संघाला सर्वसाधारण विजेतेपद. समारोप प्रसंगी  विजेत्या स्पर्धकांना तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले.

          यावेळी सहसंचालक (वित्त व लेखा) राजेश लांडे, नाशिक विभागाचे सहसंचालक निलेश राजूरकर, गिरीश देशमुख, मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे,  वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विकास गांगुर्डे आदी उपस्थित होते.
       नाशिक जिल्ह्याने क्रीकेटचे विजेतेपद पटकाविले. तर अहमदनगर संघांने दुसरा क्रमांक पटकाविला. नंदुरबार संघ उपविजेता ठरला. आज झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे-बुद्धीबळ (पुरुष) अनंत मानकर,  (महिला) विजया शेळके, टेबल टेनिस (महिला) मनीषा म्याना, गोळाफेक (पुरुष) विवेक सावंत, (महिला) ज्योती कोटावळे, जलतरण 100 मीटर (पुरुष) दीपक बर्गे.

          विजेते स्पर्धक 22 व 23 डिसेंबर रोजी पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विभागाचे प्रतिनिधीत्व करतील.  या स्पर्धांसाठी चांगली तयारी करावी असे सांगून श्री.घोरपडे यांनी विजेत्या खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. पुढील विभागीय  स्पर्धा जळगाव येथे होणार असल्याने स्पर्धेचा ध्वज जळगाव संघाकडे सुपूर्द करण्यात आला.
----

No comments:

Post a Comment