Tuesday 20 November 2018

दुष्काळ सदृश्य परिस्थिती


दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या गावात आठ प्रकारच्या सवलती

          नाशिक, दि.20 - राज्य शासनाने नाशिक जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परीस्थिती जाहीर केली असल्याने या तालुक्यात आठ विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत.
          बागलाण, नांदगाव, मालेगांव आणि सिन्नर या चार तालुक्यात गंभीर तर  चांदवड, देवळा, इगतपुरी आणि नाशिक या चार तालुक्यात मध्यम स्वरुपाची दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या तालुक्यात जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालु विजबिलात 33.5 टक्के सुट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे इत्यादी सवलती लागू करण्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी निर्देशित केले आहे.
          तसेच दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या 17 महसूल मंडळाची यादीदेखिल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कळवण तालुक्यामध्ये कळवण, नवीबेज, मोकभणगी या महसूल मंडळाचा समावेश तर दिंडोरी तालुका मध्ये मोहाडी, वरखेडा आणि दिंडारी, निफाड तालुक्यात रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, निफाड आणि येवला तालुक्यात नगरसुल, अंदरसुल, पाटोदा, सावरगाव, जळगाव ने. या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.
00000


No comments:

Post a Comment