Friday 2 November 2018

एमएसएमई


उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मीतीस चालना-डॉ.सुभाष भामरे


          नाशिक,  दि. 2- केंद्र सरकार सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना चालना देत असून त्याद्वारे रोजगार निर्मीती होण्यासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.
दादासाहेब गायकवाड सभागृहात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांशी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या सबलीकरण योजनेचे प्रमुख कुणाल कुमार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., बॅक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रमणमूर्ती आदी उपस्थित होते.

श्री. भामरे म्हणाले, तरुणाईमध्ये राष्ट्रनिर्मितीची ताकद असल्याने तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आलेल्या www.psblonsin59minutes.com  या संकेतस्थळाचे लोकार्पण या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात फुड व डिफेन्स पार्क मंजूर झाले असून त्या माध्यमातून छोट्या मोठ्या लघु उद्योगांना चालना मिळणार आहे. देशात सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचे  2.5 कोटी युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.भामरे यांनी यावेळी दिली.

श्री.कुणालकुमार म्हणाले,  उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे गरजुंना 59 मिनिटात कर्ज उपलब्ध होणार असुन  विविध बँकांचे पर्यायदेखिल उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील शेतीसोबतच जोडधंदे करण्यासाठी या माध्यमातून गरजुंना व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 कार्यक्रमाला विविध बँकांचे अधिकारी, सुक्ष्म लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
0000



No comments:

Post a Comment