Tuesday 13 November 2018

ग्रंथालयांना अर्थसहाय्य

सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
          नाशिक दि.13: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानमार्फत ग्रंथालयांसाठी  देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचेकडे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील प्रस्ताव चार प्रतीत सादर करायचे आहेत.
          केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकातातर्फे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी योजनेमधून राज्याच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in  या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 समान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी अर्थसहाय्य. 'राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा' विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य, दिव्यांग वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अर्थसहाय्य, हस्तलिखितांचे कॉपीराईट, दुर्मिळ ग्रंथ व दस्ताऐवज, जुनी नियतकालिके, ऐतिहासिक रेकॉर्डस आणि सामग्री यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी अर्थसहाय्य, डिजीटल माहिती सेवा विभाग प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य, 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य आदी प्रकारचे अर्थसहाय्य देण्यात येते.
          या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छूकांनी विहीत पद्धतीतील अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, तीत आवश्यक त्या सर्व   कागदपत्रांसह हिंदी, इंग्रजी प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिक या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत पाठवावेत, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी कळविले आहे.
                                                                00000

No comments:

Post a Comment