Tuesday 20 November 2018

जलयुक्त शिवार आढावा


जलयुक्त शिवार विभागीय आढावा बैठक संपन्न

       नाशिक, दि.20- विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालय येथे जलयुक्त शिवार अभियानाबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
          बैठकीस उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारी, सहाय्यक आयुक्त बी.के.जेजुरकर, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एन. साळुंखे, अरविंद पाटील, भूजल सर्वेक्षणचे उपसंचालक जीवन बेडवाल, कृषी सहसंचालक रमेश भदाणे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.
           यावेळी आतापर्यंत पुर्ण झालेली कामे आणि चालू वर्षाच्या आराखड्याबाबत आढावा घेण्यात आला. 2017-18 ची अपूर्ण असलेली 5 टक्के कामे 15 डिसेंबर पर्यंत पुर्ण करावी. तसेच 2018-19 च्या आराखड्याचा आढावा घेऊन तो अधिकाधीक वस्तुनिष्ठ करण्याच्या सुचना यावेळी श्री.माने यांनी दिल्या.
          नाशिक विभागाने जलयुक्त शिवार अभियानात चांगली कामगिरी केली असून 2015-16 मध्ये विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर होता. पुढील दोन वर्षेदेखील विभागाने चांगली कामगिरी केली आहे. चालू वर्षाच्या आराखड्यापैकी 84 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
          बैठकीत 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी लँडबँक  व हरितसेना नोंदणीबाबतदेखील आढावा घेण्यात आला. हरितसेना नोंदणीच्या कामांना गती देण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
----
    


No comments:

Post a Comment