Friday 15 September 2017

प्रसाद विक्रेत्यांसाठी कार्यशाळा

देवस्थान परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी कार्यशाळा

नाशिक दि. 15:-सण आणि उत्सव काळात  भाविकांना दिला जाणारा प्रसाद सुरक्षित असावा व प्रसादामुळे भाविकांना त्रास होवू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे देवस्थान परिसरातील प्रसाद, इतर अन्न पदार्थ विक्रेत्यांसाठी 17 ते 20 सप्टेंबर या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
          अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत तरतुदी व नियमांचे पालन करण्यासंदर्भात जिल्ह्यात चार ठिकाणी कार्यशाळेत माहिती देण्यात येणार आहे. नक्षत्र लॉन्स औरंगाबाद रोड, निफाड येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, सप्तश्रृंगी गड ट्रस्ट हॉल येथे 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजाता, स्वामी नारायण हॉल आडगाव नाका येथे 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता आणि शिवप्रसाद हॉल त्र्यंबकेश्वर येथे 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
          कार्यशाळेस उपस्थित राहणाऱ्या प्रसाद व अन्नपदार्थ विक्रेत्यांनी नोंदणी अथवा परवाना आणि आधारकार्डच्या छायाप्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन सहआुयक्त उ.शं.वंजारी यांनी केले आहे.

----

No comments:

Post a Comment