Monday 4 September 2017

‘संवादपर्व’ गांगोडबारी

गावपातळीवर पाण्याचा ताळेबंद तयार करणे गरजेचे-पी.के.लिलके


नाशिक, दि. 4 : पर्यावरणातील बदलांमुळे बदलेले पावसाचे वेळापत्रक लक्षात घेता पाण्याचा नियोजित वापर करण्यासाठी गावपातळीवर पाण्याचा ताळेबंद तयार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे प्र.उपअभियंता पी.के. लिलके यांनी केले.
पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, शाखा अभियंता जे.टी.पाटील, बी.एस.ढंगारे, हिरमण गवळे, उपसरपंच मनोहर गवळी, राघो मवळे, विष्णु गवळी आदी उपस्थित होते.
श्री.लिलके म्हणाले,  उपलब्ध पाणीसाठा, बाष्पीभवन, वाहून जाणारे पाणी, पिकांसाठी आवश्यक पाणी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धती निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. गावा स्वच्छ आणि रोगराईमुक्त राहण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

  
 ‘श्रीमंत राजा भद्रकाली गणेशोत्सव येथे संवाद पर्व

गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती नागरीकांना देणाच्या हेतूने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने संवाद पर्व हा उपक्रम राबवण्यात येत असून त्याअंतर्गत भद्रकाली येथील हीरक महोत्सवी वर्ष पुर्ण केलेल्या 78 व्या वर्ष जुन्या युवक उन्नती मित्र मंडळाच्या श्रीमंत राजा भद्रकाली गणेशोत्सव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माहिती अधिकारी किरण वाघ, मंडळाचे अध्यक्ष विजय ठाकरे, उपाध्यक्ष मल्हार सरपोतदार अमित पटेल आदी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.  
                                                0000

No comments:

Post a Comment