Friday 1 September 2017

संवादपर्व भोयेगाव

प्रदूषण विरहीत गणेशोत्सव साजरा करा-शरद मंडलीक

          नाशिक दि.1-सार्वजनिक गणेशोत्सवामागची मुळ संकल्पना लक्षात घेऊन नागरिकांनी प्रदूषण विरहीत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसिलदार शरद मंडलीक यांनी केले.
          भोयेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी रोहिणी पटेल, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सरपंच मंगलाबाई ठोंबरे, कृषीभुषण शिवराम बोरसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कैलास ठोंबरे, मुख्याध्यापक रामकृष्ण पगार, निवृत्ती आहेर आदी उपस्थित होते.

          गणेशोत्सवादरम्यान सामाजिक जाणीव ठेऊन समाजप्रबोधानाचे उपक्रम राबवावे. ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे कटाक्षाने पालन करावे आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवून उत्सवातील पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा. निर्माल्य पाण्याच्या स्त्रोतात न टाकता त्यापासून खत तयार करण्यासारखे उपक्रम राबवावे, असे त्यांनी सांगितले.
          डॉ. पटेल यांनी साथजन्य रोगांची माहिती दिली. गाव परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेमुळे अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.  अवयवदान महोत्सवाबाबतही डॉ. पटेल यांनी माहिती दिली. डॉ.मोघे यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली.

-----

No comments:

Post a Comment