Saturday 2 September 2017

राष्ट्रीय योगासन स्पर्धा

नाशिकला योग विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय योगस्पर्धेसाठी सहकार्य
                      -गिरीष महाजन

नाशिक दि.2-नाशिक येथे योगासनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज योग विद्यापीठ  स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना योगासनाचे उत्तम प्रात्यक्षिक पाहता यावे यासाठी नाशिक येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येईल आणि त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

नक्षत्र लॉन्स येथे नाशिक योगा कल्चर क्लबतर्फे आयोजित 30 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ते बोलत होते. कार्यक्रमाला योगासन संघटनेचे यु.के. शर्मा, प्रज्ञा पाटील, व्हीनस वाणी, डॉ.मिनाक्षी गवही, दिपेंद्र शहा,  लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी खेळाडुंनी सादर केलेले प्रात्यक्षिक पाहून खेळाडूंचे  कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षात प्रथमच ही स्पर्धा भरविण्याचा मान राज्याला आणि विशेष करून नाशिकला मिळाला आहे. स्पर्धेत उत्तमोत्तम खेळाडू सहभागी झाल्याने योगासनाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे ही प्राचीन विद्या जगभरातील 180 देशात पोहोचली आहे. चांगले आरोग्य आणि मन:शांतीसाठी योगासने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी श्री.महाजन यांनी खेळाडुंनी सादर केलेली विविध आसने पाहिले आणि खेळाडुंना टाळ्या वाजूवन प्रतिसादही दिला. खेळाडुंचे कौशल्य पाहून आपल्यालाही योगासनाविषयी अधिक आकर्षण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी देशभरातून 918 खेळाडू आणि 53 पंच सहभागी झाले आहेत. 3 सप्टेंबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे.
----


No comments:

Post a Comment