Friday 1 September 2017

‘संवादपर्व’ भालेकर मैदान

‘संवादपर्व’ उपक्रम जनजागृतीसाठी उपयुक्त -रविंद्र सिंघल


नाशिक, दि. 1 :- ‘संवादपर्व’च्या माध्यमातून चांगली माहिती दिली जात असून जनजागृतीसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी केले.
 जिल्हा माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने बी.डी. भालेकर मैदान येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, राजेंद्र भुजबळ, माहिती अधिकारी किरण वाघ, मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहूल बागमार, संदेश केदारे, प्रियदर्शन टांकसाळे, दिलीप सुर्यवंशी, प्रमोद दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

श्री. सिंगल म्हणाले, नागरीकांच्या सुरक्षा व आरोग्यासाठी शासन व न्यायालयांनी दिलेल्या सूचनांचे गणेश मंडळांनी पालन करावे. ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी ध्वनीवर्धकांच्या मर्यादीत वापराबाबत उत्सव कालावधी व विसर्जन मिरवणूक कालावधीत पालन केले जावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी माहिती अधिकारी श्री.वाघ यांनी महासंचालनालयाच्यावतीने जनसंवादासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र  आदीद्वारे  शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत असून त्यांचा वापर विद्यार्थी, युवक व नागरीकांनी करावा अशी माहिती दिली.

‘सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा’
शहर पोलिस दलाने नागरीकांमध्ये वाहतुक सुरक्षा व हेल्मेट बाबत जनजागृतीसाठी गणेशोत्सव कालावधीत पोलिस बॅन्ड पथकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘संवादपर्व’च्या माध्यमातून शासन योजनांची माहिती उपस्थित नागरीकांना देण्यात आली.

                                                -----

No comments:

Post a Comment