Monday 4 September 2017

स्वाईन फ्ल्यु बैठक

स्वाईन फ्ल्यु आजारावर प्रतिबंध हेच मुख्य औषध                                              
                                                   - महेश झगडे
       नाशिक, दि. 4 : स्वाईनफ्ल्यु या आजारावर प्रतिबंध हेच मुख्य औषध असल्याने आरोग्य विभागामार्फत जनजागृतीवर अधिक भर देण्यात यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिल्या आहेत.
          विभागीय आयुक्त कार्यालयात स्वाईनफ्ल्यु संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाडे, जिल्हा परिषदेचे डॉ. उदय बर्वे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, जिल्हा मलेरिया कार्यालयाचे डॉ. प्रदिप काकडे आदि उपस्थित होते.
          श्री. झगडे म्हणाले, स्वाईन फ्ल्यु हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्चित बरा होतो. एच 1 एन 1 या विषाणुमुळे हा आजार पसरतो. साधा फ्ल्यु व स्वाईन फ्ल्यु यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्ल्यु आजाराची त्वरीत निदान करूण त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढुन नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यु होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आजारास प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वाईनफ्ल्युबाबत जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
स्वाईन फ्ल्यु उपचारात व निदानात विलंब केल्याचे आढळुन आल्यास प्रशासनाकडुन त्याची त्वरीत गंभीर दखल घेण्यात येईल, असे श्री. झगडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्वाईन फ्ल्यु संदर्भात जनजागृती करण्यासाठी क्लस्टर मॅपिंग करण्यावर भर देऊन महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय तसेच खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात यावी आणि रूग्णालयांमध्ये झालेल्या मृत्युचे कारणांचे विश्लेषण करून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशा  सुचनाही विभागीय आयुक्त यांनी बैठकीत दिल्या.

नागरिकांनी ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा स्वरूपाची काही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. तसेच वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हाथ धुवावेत, हस्तांदोलन अथवा अलिंगण टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, शिंकताना व खोकताना रूमालाचा वापर करावा, वारंवार नाकाला व तोंडाला हाथ लावु नये. सर्दी खोकला असलेल्या नागरिकांनी त्वरीत डॉक्टरांकडुन तपासुन घ्यावे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास मृत्युचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी या आजाराबाबत विशेष काळजी घ्यावी. पौष्टिक आहार व भरपुर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, अशा स्वरूपाची काळजी घेतल्यास वेळेतच स्वाईनफ्ल्यु या आजारावर प्रतिबंध घालणे सोपे होईल.
000

No comments:

Post a Comment