Saturday 22 December 2018

जॉईन द चेंज


तंबाखूमुक्त नाशिकसाठी नाईट रनचे आयोजन
नव्या वर्षाचे स्वागत वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने

नाशिक दि.22- पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. राज नगरकर आणि नितीन उपासनी यांच्या परिश्रमातून उभ्या झालेल्या जॉईन द चेंज तंबाखूमुक्त नाशिकसाठी या अभियानाचा एक भाग म्हणून 30 डिसेंबर रोजी शहर पोलिसांतर्फे रात्री 8.00 वाजता नाईट रनचे आयोजन करण्यात आले आहे.
तंबाखूमुक्त अभियानाची व्याप्ती वाढत असून शाळा, कॉलेज, कंपन्या आणि जनसामान्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाचे स्वागत तंबाखूमुक्तीचा संदेश देवून करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांपासून  विद्यार्थ्यांपर्यंत सहा हजाराहून अधिक नाशिकर सहभागी होणार आहेत. डॉ.सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या दौडचे अंतर 5 किलोमीटर राहणार असून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी रात्री 8.00 वाजता शरणपूर रोडवरील पोलीस मुख्यालय मैदानावर उपस्थित रहायचे आहे. रात्री 9.45 वाजता दौडचा प्रारंभ होणार आहे तर 10.45 पर्यंत ती पूर्ण करण्यात येणार आहे. शहर पोलिस मुख्यालय-पोलिस आयुक्त कार्यालय-जुना गंगापूर नाका-विद्या विकास सर्कल-कॉलेजरोड-कॅनडा कॉर्नर-कुलकर्णी गार्डन-टिळकवाडी सिग्नल ते पोलिस कवायत मैदान असा या दौडचा मार्ग राहणार आहे.
नाईट रनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना पोलिसांच्यावतीने सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे. रनमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या वाहनांसाठी डोंगरे वसतिगृह मैदान आणि केटीएचएम कॉलेजच्या मैदानावर पार्किंगची सुविधा असणार आहे. रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना पाणी, एनर्जी ड्रिंक, बिस्किटे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा रनच्या मार्गावर आणि पोलिस परेड ग्राउंडवर उपलब्ध असणार आहेत. सहभागींचा उत्साह अधिक वाढावा यासाठी पोलिस बँड पोलीस कवायत मैदानावर असणार आहे. या रनमध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नोंदणीसाठी bit.do/JoinTheChange या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
-----


No comments:

Post a Comment