Saturday 22 December 2018

मतदारांना आवाहन


मतदार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन
नाशिक दि.22-लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या पूर्वतयारी अंतर्गत 123 नाशिक (पूर्व) विधानसभा मतदार संघात मतदार यादतील तपशीलासंदर्भात 24 डिसेंबर 2018 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर संबंधित पर्ववेक्षकांच्या अध्यक्षतेखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार यादी अधिक अचूक तयार करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या अंतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे. मतदार यादीतील तपशीलासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक न केलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस हजर राहून अपेक्षित सुचना कराव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. मतदार यादीतील तपशील www.ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर तपासता येईल.
----

No comments:

Post a Comment